Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

व्हेअर आर यू नाऊ ?

May 10, 2017

Search by Tags:  कविता
तरुणाईचा ताईत भाय !
आपला जस्टीन बिबर हाय
जागतिक वारी करतोय
तरुणाईचा ज्वर वाढवतोय
तो आला त्याने पहिले त्याने जिंकले
खातात पितात बोलतात जस्टीन बिबर
झोपतात उठतात ओरडतात जस्टीन बिबर
त्याला आदर्श ठेवतात
स्वतःचे व्यक्तिमत्व घडवितात
आधीच ज्वर वाढवलाय
स्वागत असे केले तरुणाईने
काय घालू अन काय नक्को !
असे हे जस्टीन बिबर वेडे
हजारो स्टायल केसांच्या
अन ! भारी कपड्यांच्या
स्वागता जस्टीन बिबरच्या !
कॉन्सर्ट साठी आले कोठून
देशविदेशाच्या कानाकोपऱ्यातून
जोश पाहून तरुणाईचा
तरुणाई पाहून थक्क झालो !
मनोरंजनासाठी जस्टीन
षडरिपूना दाखवीले डस्टबिन
सारा इंडिया एक झाला
जातीधर्माचे विसरले भान !
विसरले संगीतात देहभान
संगीतच देश जात धर्म
जस्टीन हेच ते तुझे कर्म
मला आले भरून!!!
मी हि त्यांच्या पैकी झालो !
डिजिटल इंडिया पाहून सैराटलो
चीयर अप घ्या नाचून भाऊ
थिरकलो झिंगलो आनंदलो
इंटरनॅशनल आनंद अनुभवाला
कॉन्सर्ट संपली जस्टीन राव
रातोरात गायब झालात ?
बरं व्हेअर आर यू नाऊ?


Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 1626 hits