Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गोबला गोबला सुसल्या

May 16, 2017

Search by Tags:  कविता
छोटा छोटा छोनूला
गोबला गोबला सुसल्या
भित्रेपणामुळे जातो ओळखला
सतत हलत असते तोंड
चघळत असतो चिंगम
एकेदिवशी निवांत बसला होता
डेरेदार कदंब वृक्षाखाली
एक पान पडले पाठीवरती
सुसल्याची बोबडी वळली
सुसल्या पळत सुटला
अहो बुलेट ट्रेन मागे पडली
आभाळ फाटले ओरडतच सुटला
सर्वच प्राणी हसू लागले
वाटेतच त्यांनी अडविले
कोण नका विचारू ?
सोसोबा हो त्याचे आजोबा !
कसा काय फसलास रे सुसल्या ?
ऐकून आनंदाला अन नाचला
टुणकन लॉन्ग जंप मारली
झुडपात गायब झाला
Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 1005 hits