Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

नातं

May 21, 2017

Search by Tags:  कविता
मी जाणतो मनातले
गप्प बसतो जपायचे नाते
संस्कार आईबाबांचे
आता बोला काय बोलायचे
आमंत्रणे येतात तिकडून
दाखवतो हजर राहून
नसतो जात मनापासून
मी ऍक्च्युली माणूसघाणा
दाखवतो शहाणपणा
ते म्हणतात मोठेपणा
मिळते थाप कौतुकाची
चाललाय संसाराचा गाडा
कितीही झाले मन आठवण करते
मूलवाले तुम्ही का झुकता
पाळतोय मी रूढी परंपरा
राहतो मी सासुरवाडीला
दोन दिवस तरी हर खेपेला
लोक करतात चर्चा
हा तर घरजावई शोभतो
अरे मी काय तुमचे खातो ?
मी तर नातं जपतो
वाढदिवस असो वा अनिव्हर्सरी
हमखास आमची असते स्वारी
आमचे विषय हसायला
मी लागलोय नाती जोडायला
मनाचे ऐकत नाही
त्याला स्वाभिमान लयभारी
कशाचा मलाच ठाऊक नाही
मी करत नाही त्याची हाझी हाझी
मी आहे मनकवडा
सगळ्यांना ओळखले
जग असेच चालते
ते हि तेच करतात
दुसऱ्यांना अडवितात
कारण आपले ठेवावे झाकून वृत्ती
मी नाही करीत कोणाची कॉपी
मी जपतोय नाती

Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 384 hits