Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

साद कामगारांची

May 01, 2017

Search by Tags:  कविता
आम्ही कामगार पिचलेले
खाजगी कंपनीत अडकलेले
वेळेत होतो कामावर हजर
सुटायचे नसते टाईमटेबल
राब राब राबवितात दिवसभर
कॉस्टकोटिंगच्या नावाखाली आईशपथ!
पगार मिळतो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट
एक हफ्ता सातला दुसरा सतराला
टर उडवणारे हिणवतात आम्हाला
एकदम दोन महिन्याचा घ्यालना !
अश्यावेळी तारतम्य बाळगाना?
साहेब कामाचे श्रेय लाटतातच
काय काम करतोस विचारतातच
"गाढव" " नालायक" " कामचोर" म्हणतात
अपरेसल, बोनस ,इन्क्रिमेंट ,
प्रोमोशण, इंसेण्टिवस ,साहेब घेतात
आमच्या तोंडाला पाने पुसतात
स्वतः हवी तशी सुट्टी घेतात
आम्हाला पूर्वसूचना द्या सांगतात
मग त्यावर बैठक घेतात
रजा नामंजूर करतातच
साहेबलोक स्वतः गाडीनेच फिरतात
म्हाला बस ने "जा " सांगतात
बिघडलेले अवघड काम
त्यांना नाही जमलेले
आम्हाला देतात वर "ओरडे"
कंपनीसाठी काम केले "नाही कोडकौतुक "
भीती केले तर ठरेल घोडचूक
साहेब म्हणतात केलेस उपकार ?
घेतोस कि कामाचा पगार!
गरज नसताना लाईट बंद करा फर्मान
स्वतः असेच जाणार बाहेर
मोठा साहेब आम्हाला दरडविणार
कहाणी सांगू नको डोकं वापर
अक्कल वापर तू लाईट बंद कर
असे फोडतात खापर बोडक्यावर
उलट बोललो तर काय ?
डेडलाईन काम सोडायची सांग
जबाबदार संसारी प्रपंचवाला
धीर नाही होत सोडायला
डेडलाईन ने जातो खचून
वाटते द्यावी गुलामी लाथाडून
काम केल्याचे होते जेव्हा समाधान
डेडलाईनचा विचार देतो सोडून
जेव्हा पगार होतो पटकन
परत तोच किस्सा रिपीट
आयुष्याची होते फरफट
जगण्यासाठी हि धडपड
ना धड श्रीमंत ना गरीब
त्रिशंकू होय त्रिशंकू साहेब
लोक साजरा करतात विकेंड
सुरु असतो आमचा मंथन्ड
होतो अन्याय अत्याचार
होतोय कमी पगार महिनावार
त्यातच मानतो समाधान वारंवार
इथंच फ़सलोय ना यार
माझ्यातला आवाज म्हणतोय
किती दिवस अंडी उबविणार ?
मोका बघ बाहेर बोलावतोय
याच आशेवर दिवस ढकलतोय
रात्र संपेल दिवस उजाडेल
कधी तरी चांगले होईल
कधी तरी पगारवाढ होईल
मिळेल पगार भरमसाठ
माझी कोलार होईल ताठ
वन बीएचके तरी बुक केला असता
केली असती बचतच बचत
जोडला असता पैश्याला पैसा
पण मिळत नाही ना ?
आलो चाळीत राहायला येऊन
नो स्टॅंडर्ड ऑफ लिविंग
नो मेंटेनन्स नो टेन्शन
असाच जगतोय जगलो जगणार
एक ना एक दिवस घडणार चमत्कार
कृपा होणार देवाची होईल साक्षात्कार
तूर्त जय श्रमदेव ! जय कामगार !


Search by Tags:  कविता
Top

RAMCHANDRA RANE's Blog

Blog Stats
  • 406 hits